
परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी अखेर शनिवारी (१३ मे) साखरपुढा केले. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे.

दोघांचा साखरपुडा दिल्लीतील एका खासगी हॉटेलमध्ये मोठ्या थाटात पार पडला. अभिनेत्री प्रियांका चोप्रासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही साखरपुड्याला हजेरी लावली.

परिणिती आणि राघव यांचा साखरपुडा झाला असून लग्न ऑक्टोबरमध्ये होणार आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांची पंजाबमध्ये भेट झाली. परिणिती गेल्या वर्षी 'चमकिला' चित्रपटासाठी तेथे शूटिंग करत होती. यादरम्यान तिची राघवशी भेट झाली. या भेटीनंतर त्याचं नातं आणखी खुललं.