Paris Fashion Week | वयाच्या 47व्या वर्षीही ऐश्वर्याच्या ग्लॅमरस अदा, ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये ‘बच्चन सुने’चा जलवा!

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम मॉडेल देखील आहे.

1/5
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. विशेष गोष्ट म्हणजे एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्तम मॉडेल देखील आहे. जेव्हाही ती रॅम्प वॉकवर उतरते, तेव्हा फक्त मुलंच नाही तर मुलीही तिची शैली पाहून आश्चर्यचकित होतात. तिने 1994मध्ये 'मिस वर्ल्ड' चा किताब जिंकला होता.

2/5
असेच काहीसे पॅरिसमध्ये देखील घडले. ऐश्वर्या राय जेव्हा रॅम्प वॉकवर उतरली, तेव्हा तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण अभिनेत्रीसाठी टाळ्या वाजवताना दिसले. अलीकडेच, 47 वर्षीय ऐश्वर्या रायने पॅरिस फॅशन वीक 2021मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3/5
ऐश्वर्या राय-बच्चनने ‘पॅरिस फॅशन वीक 2021’ मध्ये सुंदर पांढरा गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला. तिचा हा लूक पाहून तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण मोहित झाले. ऐश्वर्या तिच्या आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसत होती. फोटोत तुम्ही देखील पाहू शकता की, ऐश्वर्या या पांढऱ्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

4/5
या पोशाखासोबतच, तिने न्यूड मेकअप केला आहे आणि यासह तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत. ऐश्वर्याच्या या लूकला फक्त चाहतेच नाही, तर सेलेब्सही मोहित झाले आहेत. काहीजण तिला सुंदर म्हणत आहेत, तर काही तिला बॉलिवूड विश्वातील परी म्हणत आहेत.

5/5
या रॅम्प वॉकमध्ये ऐश्वर्या राय ब्रिटिश स्टार हेलन मिरेनसोबत हातात हात घालून चालताना दिसली. यानंतर गायिका-अभिनेत्री कॅमिला कॅबेलो, ऑस्ट्रेलियन स्टार कॅथरीन लँगफोर्ड, 'हाऊ टू गेट अवे विथ मर्डर' फेम अभिनेत्री अजा नाओमी किंग, हॉलिवूड स्टार अंबर हर्ड आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' अभिनेता निकोलाज कॉस्टर-वाल्डो ऐश्वर्या रायसोबत रॅम्प वॉक करत होते. या सर्व स्टार्सनी रॅम्पवर एकत्र येऊन संपूर्ण शो आणखी मनोरंजक केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI