
अभिनेत्री पूर्वा माधुरी राजेंद्र शिंदे... पारू मालिकेत पूर्वा सध्या काम करते आहे. दिशा हे पात्र सध्या पूर्वा साकारते आहे. पूर्वा बिनधास्त बोलण्यासाठी ओळखली जाते. तिने असंच एका विषयावर आपलं परखड मत मांडलं आहे.

पूर्वा शिंदे तिच्या ब्रेकअपवर भाष्य केलं. ब्रेकअप का झालं? यावर तिने भाष्य केलं आहे. मी खूप सेन्सिटिव्ह आहे. मला टॉलरेट करणं सोपं नाहीये. याच कारणाने माझं ब्रेकअप झालं, असं पूर्वा म्हणाली.

मी सहा वर्षे एका मुलाला डेट करत होती. पण तो आता मला समजून घेत नाही. तो आधी मला फार समजून घ्यायचा. त्यामुळे आमचं छान चाललं होतं. पण आता तो समजून घेईना म्हणून आमचं ब्रेकअप झालं, असं पूर्वाने सांगितलं.

माझ्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला समजून घेणं खूप गरजेचं आहे. माझे मूड स्विंग्ज होत असतात. त्यामुळे मला समूजन घेणारा जोडीदार असला पाहिजे. यापुढे येणाऱ्या व्यक्तीला माझं हेच सांगणं असेल, असं पूर्वा म्हणाली.

मी आतापर्यंत निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. त्यामुळे लोक माझा राग-राग करतात. तिच माझ्या कामाची पावती आहे. तर काही फॅन्स असेही भेटतात जे माझं काम आवडतं असं म्हणतात, असंही पूर्वाने सांगितलं.