
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड... प्राजक्ताने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

येसूबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. आताही तिने असंच खास फोटोशूट केलं आहे.

ग्रे कलरच्या गाऊनमध्ये प्राजक्ताने खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताच नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे.

खूप सुंदर दिसताय राणीसाहेब..., अशी कमेंट एका चाहत्याने केलीय. मनमोहक सौंदर्यवती, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. नेहमी प्रमाणे सुंदर दिसतीयेस, असं म्हणत प्राजक्ताच्या लूकला पसंती दिली आहे.

वेस्टर्न आऊटफिटसोबतच पारंपरिक वेशभूषेतील फोटोही प्राजक्ता सोशल मीडियावर शेअर करत असते. पिवळ्या रंगाच्या साडीत काही दिवसांआधी प्राजक्ताने हे खास फोटोशूट केलं होतं. यालाही चाहत्यांनी पसंती दिली होती.