
बिग बॉस 14 मधील स्पर्धेक आणि गायक राहुल वैद्य हा नेहमीच चर्चेत असतो. राहुल वैद्य याने काही दिवसांपूर्वीच फोटो शेअर करत सांगितले की, आपल्या घरी लवकरच लहान बाळाचे आगमन होणार आहे.

नुकताच राहुल वैद्य याने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये राहुल वैद्य हा मुंबईच्या लोकलमध्ये बसलेला दिसत आहे. राहुल वैद्य याने लोकलमधील फोटो शेअर केले.

या फोटोमध्ये लोकलमध्ये मस्ती करताना राहुल वैद्य हा दिसतोय. हे फोटो शेअर करताना राहुल वैद्य याने लिहिले की, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणे माझ्यासाठी प्रेम आहे.

हे मला माझ्या बालपणीच्या दिवसांची आठवण करून देते... मी जिथून आलोय.. तसेच यामुळे मला आनंद होतो. आता राहुल वैद्य याचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी राहुल वैद्य याने सांगितले होते की, लहाणपणी तो नेहमीच मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत असे. मुंबईच्या लोकल ट्रेनसोबत त्याचे खास नाते आहे.