
आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्यापासून सुपरस्टार राम चरण हा प्रचंड चर्चेत आहे. मुळात म्हणजे साऊथ स्टार राम चरण याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

राम चरण याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. नुकताच राम चरण याने नेपोटिझमवर मोठे भाष्य केले आहे. ज्येष्ठ कलाकार चिरंजीवी यांचा मुलगा हा राम चरण आहे.

नुकताच इंडिया टुडेशी बोलताना नेपोटिझमवर राम चरण म्हणाला की, ही एक झुंड मानसिकता आहे. माझा कल फक्त आणि फक्त अभिनयाकडे आहे. जर माझ्याकडे अभिनयाची कला नसती तर मी 14 वर्ष इथे अजिबात टिकू शकलो नसतो.

इथंपर्यंत पोहचणारा प्रत्येक कलाकार हा टॅलेंटमुळेच आहे, कारण तुमची प्रतिभा स्वतःच बोलते. मी जर अभिनेता नसतो तर सामान्य माणूस असतो तर अभिनेत्याचा मुलगा आहे म्हणून थिएटरच्या बाहेर 100 ते 500 रुपये खर्च केले नसते.

म्हणजेच सरळ सरळ राम चरण याने म्हटले आहे की, नेपोटिझम वगैरे काही नसून तुमची कलाच तुम्हाला ओळख देते. अभिनय क्षेत्रामध्ये फक्त तुम्हाला तुमच्या टॅलेंटमुळेच ओळख मिळते.