रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार चित्रपट ठरला बाॅक्स ऑफिसवर हीट, 11 दिवसांमध्ये इतक्या कोटींचे कलेक्शन
रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेले होते.

रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे स्क्रीन शेअर करताना दिसले.

विशेष म्हणजे रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट 8 मार्च रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय.

विशेष म्हणजे तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने 11 दिवसांमध्ये 100 कोटींची आकडा पार केलाय. बाॅक्स आॅफिसवर तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे.

कोरोनानंतर तू झूठी मैं मक्कार हा सातवा चित्रपट आहे, ज्याने बाॅक्स आॅफिसवर 100 कोटींची कमाई केलीये. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जाताना दिसत आहेत.

रणबीर आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली आहे. रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन यांचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते.