
बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा 4 सप्टेंबर रोजी 69 वा वाढदिवस होता. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. दुपारी, संपूर्ण कुटुंबानं रणधीर कपूर यांच्या घरी एकत्र जेवण केलं, ज्यात करिश्मा कपूर आणि करीना कपूर खान यांचाही समावेश होता. यानंतर ऋषी कपूर यांचे मित्र आणि कुटुंबीयांनी रात्री उशिरा पार्टी केली.

ऋषी कपूर यांची ही वाढदिवसाची पार्टी रुमी जाफरी आणि हनन जाफरी यांनी आयोजित केली होती. खुद्द ऋषी कपूर यांनीही या पार्टीला हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही.

यावेळी ऋषी कपूर यांची आठवण करून देणारा पुतळा या पार्टीमध्ये ठेवण्यात आला होता, जो तुम्ही फोटोमध्ये देखील पाहू शकता.

ऋषी कपूर यांचे खास मित्र शत्रुघ्न सिन्हा, डेव्हिड धवन आणि डब्बू साहब यांनीही या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली. या व्यतिरिक्त, या पार्टीमध्ये आणखी बरेच लोक दिसले.

ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण आनंदी दिसत होता. प्रत्येकाने त्यांना आठवून त्यांच्या वाढदिवसाचा केकही कापला.