
सैराट हा सिनेमा तुम्ही पाहिलात का? हा सिनेमा पाहिला नाही, असा क्वचितच कुणी असेल. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचं काम अन् गाण्यांनी सिनेरसिकांना अक्षरश: 'याड लावलं'... या सिनेमातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू...

रिंकू राजगुरू ही सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सिनेमांना लोक गर्दी करतात. तिचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे. पण तुम्ही रिंकूचे जुने फोटो पाहिलेत का?

सैराटच्या चित्रिकरणादरम्यानचा रिंकूचा हा खास फोटो... रिंकूच्या एका चाहत्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

सैराटमधले आर्ची आणि परशा... या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचा हा जुना फोटो...

सैराट या सिनेमात रिंकूचं पात्र आर्ची हे प्रचंड डॅशिंग दाखवण्यात आलं होतं. ती बुलेट चालवताना दाखवलं होतं. असाच बुलेटवरचा रिंकूचा हा फोटो आणि सैराटमधील गुलाबाची फुलं हातात घेतलेला हा फोटो...