
साऊथ क्वीन समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने तिच्या अभिनयाने आणि लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. तिचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे, ज्यामुळे ती नेहमी प्रमाणे पुन्हा चर्चेत आली आहे.

समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती रोज तिचे फोटो शेअर करत असते. यावेळी तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

समंथाने काळ्या स्कर्टसह बीन कलरचा ब्रालेट आणि मल्टीकलर श्रग परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक तिने तिच्या नेकपीसने पूर्ण केला आहे.

समंथाचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंना 2 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. समंथा हा पोशाख परिधान करून एका अवॉर्ड फंक्शनला गेली होती.

समंथाने तिच्या पहिली वेब सीरीज, ‘द फॅमिली मॅन 2’साठी हा पुरस्कार जिंकला आहे. समंथाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.