
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) आपल्या करिअरची सुरुवात ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे केली होती. अभिनेत्री दररोज तिच्या चाहत्यांसाठी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने अलीकडेच आपले खास फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आसाममध्ये पोहोचली होती. अभिनेत्री तिच्या ‘वीरांगनी’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे आली आहे. या दरम्यान सारा एका मंदिरात पोहोचली आणि तिने तिथून काही फोटो शेअर केले.

अभिनेत्रीने कामख्या मंदिराचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती आसामी लूकमध्ये दिसली आहे. चाहत्यांमध्ये हे फोटो खूप लोकप्रिय झाले आहेत.

अभिनेत्री ‘वीरांगनी’ या चित्रपटात कमांडोच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत शूटिंगमधून वेळ काढून अभिनेत्री मंदिरात पोहोचली आहे.

त्याचवेळी अभिनेत्रीचे हे फोटो पाहून काही वापरकर्ते तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

काही वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘मुसलमान असूनही तू हिंदू देवाची उपासना करतेस’. तर, अनेक वापरकर्त्यांनी अभिनेत्रीला धर्माबद्दल बोल लगावले आहेत.