
सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत आहे.

सारा अली खान हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अजूनही म्हणावा तसा तिचा एकही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला नाहीये.


सारा आणि कार्तिक आर्यन यांचा लव आज कल हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर सारा अली खान इतकी जास्त घाबरली की, तिने अपयशाच्या भितीने आगामी चित्रपट करण्यास नकार दिला.

एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने सांगितले की, मी अपयशाच्या भीतीने डायरेक्टर आनंद एल राय यांना काॅल केला आणि त्यांना म्हटले की, तुमच्या चित्रपटासाठी दुसरी व्यक्ती घ्या. त्यानंतर आनंद एल राय यांनी मला अत्यंत महत्वाचा सल्ला दिला.