
सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या तिच्या मित्रपरिवारासोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. सुट्टीच्या काळात ती तिच्या मैत्रिणीसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तत्पूर्वी, साराने तिच्या बेस्ट फ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला. सारा मालदीवमध्ये तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करत होती.

नुकतीच तिची आई अमृता सिंह आणि बेस्ट फ्रेंड्ससोबत मालदीवच्या सहलीतून परतलेली अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे. अलीकडेच, तिने तिच्या ट्रिपमधून काही फोटो टाकले. ज्यातील तिच्या बिकिनी बीच लुकवर चाहत्यांच्या नजर खिळल्या आहेत आणि नेटिझन्स घायाळ झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून, सारा तिच्या आईसोबत मालदीवच्या प्रवासाची झलक शेअर करत होती आणि नेहमीप्रमाणे, तिच्या चाहत्यांना तिच्या या व्हेकेशन डायरीच्या प्रत्येक गोष्टी आवडत होत्या.

नुकतेच साराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा सर्वात जवळची मैत्रीण कामियाह सोबत दोन फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये सारा फ्लोरल ब्लू बिकिनीमध्ये पोज देताना दिसू शकते. तिचे केस अर्धवट बांधलेले होते आणि मेकअप अगदी कमीतकमी केला होता.

सारा तिच्या जिवलग मैत्रिणींसोबत समुद्राच्या किनाऱ्याचा आनंद घेताना दिसली. दुसऱ्या फोटोमध्ये, सारा आणि तिची सर्वात चांगली मैत्रीण कामियाह धमाल करताना दिसत आहे.