
बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री गौहर खान आज 23 ऑगस्ट रोजी 38 वर्षांची झाली आहे. गौहरनं गेल्या वर्षी 25 डिसेंबरला प्रियकर जैद दरबारशी लग्न केलं. जैद गौहरपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे मात्र या जोडीला 'एज इज जस्ट अ नंबर' यावर विश्वास आहे अर्थात वय फक्त एक संख्या आहे, त्यापेक्षा अधिक काही नाही. त्या दोघांना काही फरक पडत नाही.

खरं तर, गौहर आणि जैद ग्रॉसरी शॉपमध्ये एकमेकांना भेटले. गौहरला पाहिल्यानंतर जैदनं तिला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. याबद्दल बोलताना जैदनं लिहिलं होतं की त्यानं आजपर्यंत गौहरसारखी सुंदर मुलगी पाहिली नाही. लॉकडाऊन असूनही दोघं एकमेकांना भेटत राहिले. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आज दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.

गौहर बिग बॉस 7 ची विजेती आहे. या व्यतिरिक्त, गौहर एक यशस्वी मॉडेल देखील आहे.

गौहर खान लॅक्मे फॅशन शो 2006 मध्ये डिझायनर लसेल सिमन्ससाठी शो-स्टॉपर बनली, तेव्हा ती वॉर्डरोब मालफंक्शनची बळी पडली होती. यानंतर गौहर पूर्णपणे तुटली होती.

आतापर्यंत गौहरनं अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपट, वेब सीरीज आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.

पती जैदसोबतचे तिचे व्हिडीओ आणि यूट्यूबवर येणारे तिचे ट्यूटोरियल चाहत्यांच्या पसंतीत उतरतात.