
दाक्षिणात्य कलाकारांची क्रेझ लोकांमध्ये इतकी जास्त वाढलीयं की, आता थेट श्रीगणेशाच्या मूर्तीवर साऊथ स्टार्सची प्रतिमाही अनेकांनी साकारली आहे. या मूर्तीमध्ये साऊथचे सुपरस्टार राम चरण यांची प्रतिमा दिसते.

राम चरण गणेशाची ही मूर्ती लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. लोकांनाही ही मूर्ती खूप जास्त आवडत आहे. बाजारपेठेतही या प्रकारच्या मूर्तींची मोठी मागणी आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच पुष्पा चित्रपट आवडला आहे. आता बाप्पाच्या मूर्तीवर अल्लू अर्जूनची प्रतिमा साकारण्यात आलीयं.

'बाहुबली'वर शिल्पकाराने प्रभासच्या रूपात गणेशाची मूर्ती बनवली आहे, जी लोकांना खूप आवडली आहे. पांढऱ्या रंगात रंगवलेल्या या गणेशमूर्तीची मागणीही जास्त आहे.

साऊथचे दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार यांची गणपतीसोबत मूर्ती तयार करण्यात आलीयं. याही मुर्तीची बाजारपेठेत मागणी जास्त होती.

बाप्पाची मूर्ती मुंबई पोलिसांच्या रुपात तयार करण्यात आली असून, मुंबईतील विलेपार्ले पोलिस ठाण्यात त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.