
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्याच लेकाची मोठी पोलखोल केलीये. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये आर्यन खान याच्याबद्दल शाहरुख खान याने मोठा खुलासा केला आहे. शाहरुख खान थेट म्हणाला की, एक चांगला अभिनेता होण्यासाठी जे गुण लागतात ते आर्यनकडे नाहीयेत.

विशेष म्हणजे आर्यन खान याला देखील स्वत: ला अभिनेता व्हायचे नाहीये. एक अभिनेता होण्यासाठी जे काही तुमच्या अंगात गुण हवेत, ते आर्यन याच्यामध्ये अजिबातच नाहीत. यामुळे तो अभिनेता होणार नाहीये.

शाहरुख खान हा पुढे म्हणाला की, आर्यन खान हा एक उत्तम लेखक आहे. लेखकाकडे जे गुण हवे आहेत, ते सर्व आर्यन याच्याकडे नक्कीच आहेत. शाहरुख खान याने स्पष्ट केले की, आर्यन खान हा भविष्यात अभिनेता होणार नाहीये.

शाहरुख खान हा कायमच चर्चेत असतो. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झालाय. पठाण चित्रपटात शाहरुख खान हा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने धमाकेदार कमाई नक्कीच केलीये.

शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आर्यन खान याने देखील एका चित्रपटाचे काम सुरू केले आहे. शाहरुख खान हा सध्या त्याच्या डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.