shehnaaz gill | बॅकलेस लूकमध्ये शहनाज गिल हिच्या हटके अदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) नुकताच, ‘थँक यू फॉर कमिंग’ (Thank You For Coming) सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला आहे. पण शहनाज तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आली. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री शहनाज गिल (shehnaaz gill) अभिनेता सलमान खान याच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. पण आता शहनाज तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली आहे.

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. चाहते देखील अभिनेत्रच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शहनाज सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शहनाज कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयु्ष्यामुळे चर्चेत असते. 'बिग बॉस'मुळे शहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. शोमध्येच शहनाज गिल आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांच्यामध्ये प्रेम बहरलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. पण अभिनेत्याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

पण आता शहनाज हिच्या नावाची चर्चा प्रसिद्ध पंजाबी गायक गुरु रंधावा याच्यासोबत होत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. सध्या सर्वत्र शहनाज गिल हिची चर्चा रंगली आहे.