
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर क्रिएटिव्ह कॅप्शन देत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. तिचे कॅप्शन्स वाचून तिचे फॅन्स तिच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स करतात.

आताही श्रद्धाने क्साली फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. कुणा- कुणाला पाऊस आवडतो? असं म्हणत श्रद्धाने हे खास फोटो शेअर केलेत. यावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

श्रद्धाने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी तिच्या फोटोंना पसंती दिलीय. तसंच तिच्या पोस्ट भन्ना कमेंट्स केल्या आहेत. कुणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? असं श्रद्धाच्या चाहत्याने म्हटलं आहे.

मला पाऊस खूप आवडतो. पण पावसात जर वादळ सुटलं तर ते मला नाही आवडत, अशी कमेंट श्रद्धाच्या चाहत्याने केली आहे. मला पाऊस, चहा आणि तू आवडतेस, अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने केली आहे.

बाहेर पाऊस पडतोय आणि मी तुझा सिनेमा पाहतोय, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तुला पाऊस आवडतो आणि मला पावसात तू..., अशी कमेंट नेटकऱ्याने श्रद्धा कपूरच्या फोटोवर केली आहे.