सर्वात स्वस्त कार, 34 किमी मायलेज अन् किंमत फक्त 5.97 लाख रुपये, लुक पाहून शेजारचा पण जळेल
जर तुम्ही देखील दिवाळीमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर 34 किमी मायलेज देणारी ही कार तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर. किंमत फक्त 5.97 लाख रुपये. फीचर्स देखील सर्वात जबरदस्त.

पहिल्यांदाच कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बजेट, मायलेज, सुरक्षितता, फीचर्स आणि गाडी चालवण्यातील सुलभता या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीकडे अशा ग्राहकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये Maruti Celerio CNG, Maruti Dzire आणि Maruti Fronx या तीन गाड्या विशेष लक्ष वेधून घेतात. या तिन्ही कारची वैशिष्ट्ये, किंमत आणि मायलेज जाणून घेऊया.
Maruti Celerio CNG
पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी Maruti Celerio CNG हा फायदेशीर आणि व्यावहारिक पर्याय ठरू शकतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,97,900 रुपये आहे. कॉम्पॅक्ट आकारामुळे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर गाडी चालवणे आणि पार्किंग करणे सोपे जाते.
कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार 34.43 किमी मायलेज देते. त्यामुळे दररोजच्या प्रवासासाठी आणि कमी खर्चात गाडी चालवू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
Maruti Dzire
पहिल्या कारमध्येच सेडानचा प्रीमियम अनुभव हवा असेल तर Maruti Dzire हा पर्याय विचारात घेता येईल. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6,25,600 रुपये आहे. आकर्षक LED हेडलाइट्स, नवीन फ्रंट ग्रिल आणि क्लासिक थ्री-बॉक्स डिझाइनमुळे तिला वेगळा लूक मिळतो.
सुरक्षिततेच्या बाबतीतही Dzire महत्त्वाची ठरते. यामध्ये 1.2-लिटर Z-Series इंजिन मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 24.79 किमी तर CNG व्हेरिएंटचे मायलेज 33.73 किमी मायलेज मिळते.
Maruti Fronx
तरुण ग्राहकांना स्पोर्टी लूक आणि SUVसारखा अनुभव हवा असेल तर Maruti Fronx हा आकर्षक पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.90 लाख रुपये आहे. स्लोपिंग रूफलाइन, बोल्ड फ्रंट ग्रिल आणि 190 मिमी ग्राउंड क्लीयरन्समुळे तिचा लूक उठून दिसतो.
Fronxच्या केबिनमध्ये प्रीमियम ड्युअल-टोन प्लम आणि ब्लॅक थीम देण्यात आली आहे. हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी तसेच वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay यांसारखी फीचर्स मिळतात. कंपनीच्या दाव्यानुसार, पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 21.79 किमी तर CNG व्हेरिएंटचे मायलेज 28.51 किमी आहे.
महत्त्वाचे: वरील किंमती एक्स-शोरूम आहेत. प्रत्यक्ष ऑन-रोड किंमत शहर, व्हेरिएंट आणि इतर शुल्कांनुसार बदलू शकते. मायलेजचे आकडे कंपनीने दिलेले दावे असून प्रत्यक्ष मायलेज ड्रायव्हिंगची पद्धत आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार वेगळे असू शकते.
