AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Health Update : शरद पवार रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? सध्या तब्येत कशी? खुद्द डॉक्टरांनीच दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

शरद पवार आज दुपारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना छातीत थोडेफार दुखत होते. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. ते ठिक आहेत. दोन दिवस आराम केल्यानंतर त्यांना घरी सोडलं जाणार आहे.

Sharad Pawar Health Update : शरद पवार रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं? सध्या तब्येत कशी? खुद्द डॉक्टरांनीच दिली सर्व प्रश्नांची उत्तरं
sharad pawar health updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 02, 2026 | 7:30 PM
Share

Sharad Pawar Health Update : खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांना अचानक रुग्णालयात का न्यावे लागले, असे विचारले जात होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही तातडीने प्रतिक्रिया देत काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे सांगितले. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत खुद्द डॉक्टरांनी समोर येत माहिती दिली आहे. शरद पवार यांना नेमकं काय झालंय? त्यांना किती दिवस रुग्णालयात राहावे लागणार, याची सविस्तर माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर डिस्चार्ज दिले जाणार

रुबी रुग्णालयातील डॉक्टर परवेझ ग्रँट यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना काय त्रास आहे, याची माहिती दिली. शरद पवारांना आज (2 नोव्हेंबर) दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना ऍडमिट करण्यात आले आहे. काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे, असे डॉक्टर परवेझ यांनी सांगितले.

शरद पवार गोळ्या, औषधांनी बरे होणार

तसेच, शरद पवार आज दुपारी रुग्णालयात दाखल झाले. त्यांना छातीत थोडेफार दुखत होते. त्यांच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. ते ठिक आहेत. दोन दिवस आराम केल्यानंतर त्यांना घरी सोडलं जाणार आहे. शरद पवार यांचे सीटीस्कॅन करण्यात आले आहे. त्यांच्या फुफ्फुसांत थोडसं फ्ल्यूअड आहे. गोळ्या, औषधांनी ते बरे होतील, अशी अतिरिक्त माहिती डॉक्टर परवेझ ग्रँट यांनीद दिली. तसेच शरद पवार यांची प्रकृती खूप चांगली आहे, काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पवार यांच्याकडून दुष्काळी भागाचा दौरा

दरम्यान, शरद पवार यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा सुरू केला होता. शेतकऱ्यांना भेटून ते त्यांच्या व्यथा जाणून घेत होते. असे असताना त्यांची तब्येत बिघडली आहे. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काहीही काळजी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...