
श्रद्धा कपूर जितकी लोकप्रिय अभिनेत्री आहे तितकीच ती एक डाउन-टू-अर्थ व्यक्ती आहे आणि तिच्या गोड स्वभावामुळेच तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.

मंगळवारी संध्याकाळी श्रद्धा मुंबईत स्पॉट झाली. या दरम्यान श्रद्धाला पाहून चाहत्यांची एकच गर्दी जमली.

श्रद्धाला भेटण्यासाठी सर्वजण तिथे पोहोचले आणि श्रद्धा चाहत्यांच्या गर्दीत घेरली गेली.

श्रद्धा सर्व चाहत्यांना भेटली आणि त्यांच्याशी खूप चांगले वागली. श्रद्धाचे हे वर्तन पाहून चाहतेही खूप खूश झाले.

श्रद्धाच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. जरी या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.