Shweta Tiwari | दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारी हिचा बोल्डनेस; फोटो व्हायरल

अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

| Updated on: Aug 14, 2023 | 1:49 PM
1 / 5
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

2 / 5

सोशल मीडियावर वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5

सोशल मीडियावर देखील श्वेताची कायम चर्चा रंगलेली असते. वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

4 / 5

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. श्वेताच्या मुलीने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

5 / 5

श्वेता तिवरी हिची लेक आणि अभिनेत्री पलक तिवारी देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून पलक हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us