
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांच्या घरी 'लिटिल चॅम्प'चं आगमन झालं आहे. कार्तिकीने गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. कार्तिकीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

मुलगा झाल्याची माहिती कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यामुळे या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

2020 मध्ये कार्तिकीने रोनित पिसेसोबत लग्नगाठ बांधली. लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकीने ही आनंदाची बातमी दिली आहे.

कार्तिकीचा पती पुण्यात स्थित प्रसिद्ध व्यावसायिक आहे. तर कार्तिकी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'या कार्यतक्रमातून घराघरात पोहोचली आहे. तिच्या गाण्याला रसिकांची पसंती मिळते.