
सध्या बाॅलिवूडमधील दोन मुद्दे सर्वात जास्त गाजत आहेत, एक म्हणजे बॉयकॉट ट्रेंड आणि दुसरा म्हणजे नेपोटिझम (घराणेशाही) या दोन मुद्दामुळे बाॅलिवूड चित्रपटांना मोठा फटका बसताना दिसत आहे.

शक्यतो बाॅलिवूडमधील मोठे स्टार हे बॉयकॉट ट्रेंड आणि नेपोटिझमवर बोलणे टाळतात. फक्त स्टारच नाही तर बाॅलिवूड संबंधित कोणीच यावर भाष्य करत नाही. बॉयकॉटचा फटका आमिर खान आणि अक्षय कुमार याच्या चित्रपटांना बसला आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये गायक लकी अली यांनी बॉयकॉटबद्दल मोठे भाष्य केले असून यावर त्यांनी आपले मत मांडले आहे. यामुळेच सध्या लकी अली हे चर्चेत आले असून त्यांनी यावर आपले सडेतोड मत मांडले.

लकी अली बॉयकॉट ट्रेंडबद्दल बोलताना म्हणाले की, मी तर बाॅलिवूड समजतच नाही, मी याला भारतीय चित्रपट उद्योग समजतो. इथे अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत पण त्याला बॉलीवूडचे नाव देण्यात आले आहे. जे बाहेरच्या लोकांनी दिले आहे... यात अभिमान वाटण्यासारखे काही नाही.

आता लकी अली यांचे हे विधान चर्चेता विषय ठरला आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचे फेमस गाणेही म्हटले. आता याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.