
‘बिग बॉस ओटीटी’ फेम अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. या शो पासून ती चर्चांचा एक भाग राहिली आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत राहते.

आज पुन्हा उर्फी तिच्या लूकमुळे चर्चेचा भाग बनली आहे. उर्फीने सॉक्स अर्थात पाय मोज्यांमधून क्रॉप टॉप बनवला आहे. ज्याबद्दल तिने स्वतः माहिती दिली आहे.

फोटो शेअर करताना उर्फीने लिहिले की, क्रॉप टॉप पाय मोज्यांपासून बनवले गेले आहे आणि टी-शर्ट अर्धे कापून हा जॅकेट तयार केला आहे. नवा पोशाख तयार आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या लूकसाठी काही लोक उर्फीला ट्रोल करत आहेत, तर काही तिचे कौतुक करत आहेत. प्रत्येक वेळी, ट्रोलिंगकडे लक्ष न देता, उर्फी बोल्ड फोटो शेअर करत राहते.

एका चाहत्याने तिचे कौतुक केले आणि लिहिले, ‘खूप सुंदर’. तर दुसऱ्याने लिहिले – ‘UFF काय अदा आहेत...’ हजारो लोकांनी तिचे फोटो लाईक केले आहेत.

पाहा याच ड्रेसमुळे उर्फी चर्चेत आली आहे.