
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानने नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचे वडील मन्सूर अली खान यांच्या कबरीवर प्रार्थना करताना दिसत आहे.

सोहा अली खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिची मुलगी इनाया नौमी खेमू आणि आई शर्मिला टागोरही तिच्यासोबत दिसल्या आहेत.

मन्सूर अली खान पतौडी यांची काल पुण्यतिथी होती, 10 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. अशा परिस्थितीत सोहा अली खान वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आई शर्मिला टागोर यांच्यासह पतौडी गावात पोहोचली.

सोहा अली खानने आपली मुलगी इनायासोबत वडिलांच्या कबरीवर दुआ पाठ केली. या दरम्यान, तिनं पांढऱ्या रंगाच्या सूट सलवारमध्ये परिधान केला होता.

यावेळी सोहा प्रचंड भावूक दिसली.