
सौंदर्याच्या बाबतीत सर्वांना मागे टाकणारी उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. उर्वशी तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिनं सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. उर्वशी प्रत्येक फोटोत कहर करताना दिसते आहे.

उर्वशी रौतेलानं तिच्या या फोटोंमध्ये गोल्डन फॉइल रॅप ड्रेस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये ती 'सोन परी' सारखी दिसत आहे. उर्वशी रौतेलाच्या या फोटोंवर लाईट इफेक्ट दिसून येत आहे. तिनं आपले केस खूप चांगले स्टाईल केले आहेत. एवढंच नाही तर खूप दागिने परिधान केले आहेत.

उर्वशी रौतेलाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते पुन्हा एकदा प्रेमात पडत आहेत. चाहत्यांच्या हे फोटो खूप पसंतीस उतरत आहेत, या फोटोंवर कमेंट करत चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.

नुकतंच उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमझानसोबत 'वर्सास बेबी' मध्ये दिसली होती. सोबतच, तिनं गुरु रंधावासोबत एक हिट गाणं देखील केले आहे.

आगामी काळात ती जिओ स्टुडिओच्या 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. या मालिकेत रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.