
अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून तिच्या आयुष्यातील क्षण चाहत्यांसोबत शेअर करते. यावेळी सुहाना खानने तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या नाईट आऊटचे काही फोटो शेअर केले आहेत.

शनिवारी सुहाना खानने तिच्या मित्रांसोबत न्यूयॉर्कच्या नाईट लाईफचा आनंद घेतला. सुहानाने तिचे फोटो शेअर करून तिचा ग्लॅमरस लूक दाखवला. सुहानाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तुम्ही तिला स्ट्रॅपलेस लेदरच्या शॉर्ट लाल ड्रेसमध्ये पाहू शकता.

सुहाना खानने या ड्रेससह तिच्या केसांची पोनीटेल बनवली आहे. सुहानाने न्यूड प्लॅटफॉर्म हील्स आणि व्हाईट पर्सने तिचा लूक आणखी ग्लॅमरस केला.

सुहानाने डायमंड कानातले घालून तिचा लूक परफेक्ट केला. फोटोमध्ये, तुम्ही सुहानाला तिच्या मैत्रिंणीसोबत देखील पाहू शकता, या सगळ्याच पार्टी मूडमध्ये दिसत आहेत.

सुहानाच्या मैत्रिंणीनीही त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये हे सर्व न्यूयॉर्कच्या रस्त्यावर हातात हात घालून रात्रीचा आनंद घेताना दिसत आहेत. सुहाना खानचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. सुहाना खानच्या एका फॅन पेजनं इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत.