
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सोशल मीडिया स्टार गुलीगत सूरज चव्हाणने अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आजच्या भागात सूरज पॅडी आणि अंकितासोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे.

'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना सूरजला गावची आठवण आली आहे. माझ्यासाठी गाव महत्वाचं आहे... कधी गावाकडे जातोय आणि सर्वांना भेटतोय असं मला झालंय. इथे नुसता आरडाओरडा सुरू असतो, असं सूरज म्हणतो.

आपल्या भावनांवर कंट्रोल करणं गरजेचं आहे, असं अंकिता त्याला म्हणते. त्यावर सूरज चव्हाण तिला उत्तर देतो. मी एकदम साधा माणूस आहे. पण राग आला तर मी पुढचं मागचं बघत नाही. इथे मी स्वत:ला खूप कंट्रोल केलंय, असं सूरज म्हणतो.

आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. यात सूरज चव्हाण पॅडीचा मसाज करताना दिसतोय. सूरजचा मसाज पाहून पॅडी दादा म्हणतो की, तुला मसाज काय असतो तेच दाखवतो! आधी 'बिग बॉस'च्या घरात न बोलणारा सूरज चव्हाण आता हळूहळू बोलायला लागला आहे. आता त्याचा गेम लोकांना आवडू लागला आहे.

सूरज हा अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. सोशल मीडियावरून प्रसिद्ध झालेला सूरज आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात पोहोचला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याचा वावर लोकांना आवडतो आहे. त्याचा साधेपणा लोकांना भावतो आहे.