
बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने लग्नानंतर पहिल्यांदा ईद साजरी केलीये. सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत स्वरा भास्कर हिने सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या होता. काही दिवसांपूर्वी स्वराचे लग्न झाले आहे.

नुकताच स्वरा भास्कर हिने ईदचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्वरा भास्कर हिचा लूक जबरदस्त दिसतोय. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब दिसत आहेत.

आता स्वरा भास्कर हिने शेअर केलेल्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत. ब्लू रंगाच्या शरारा सूटमध्ये स्वरा भास्कर हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे.

स्वरा भास्कर हिने हे फोटो शेअर केल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले जात आहे. दुसरीकडे काही लोक स्वरा भास्कर हिला ईदच्या शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत.

स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमद याच्यासोबत लग्न केले आहे. 6 जानेवारीला यांनी अगोदर कोर्टात लग्न केले. स्वरा भास्कर हिने ही गोष्ट बरेच दिवस लपवून ठेवली होती.