Neha Kakkar : ‘कुणी तरी येणार गं, येणार गं!’, बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर स्पॉट झाल्यानंतर प्रेग्नन्सीच्या चर्चा

नेहाची चालण्याची पद्धत आणि तिचा लूक पाहून अनेक चाहते तिला गर्भवती आहेस का ? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहेत. (Talk about Pregnancy after Bollywood singer Neha Kakkar was spotted)

1/6
Neha Kakkar spotted
बॉलिवूड सिंगर नेहा कक्करनं गेल्या वर्षी रोहनप्रीत सिंगसोबत लग्नगाठ बांधली. नेहा आणि रोहन दोघंही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. नेहमीच कामात व्यस्त असणार्‍या नेहानं काही काळ इंडियन आयडल 12 मधून ब्रेक घेतला होता. शोमध्ये ती दिसली नाही.
2/6
Neha Kakkar spotted
नेहा काल पती रोहनप्रीतबरोबर शॉपिंगला गेली होती. यादरम्यान, ती सैल टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसली. नेहाचे फोटो पाहिल्यानंतर चाहते ती गर्भवती आहे की नाही असा अंदाज लावत आहेत.
3/6
Neha Kakkar spotted
नेहाची चालण्याची पद्धत आणि तिचा लूक पाहून अनेक चाहते तिला गर्भवती आहेस का ? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारत आहेत.
4/6
नुकतंच नेहाचा विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नेहाचा लूक पाहिल्यानंतर चाहते तिच्याकडून प्रेग्नन्सीबद्दल विचारत होते. व्हिडीओमध्ये रोहनप्रीत नेहाच्या हातात हात घेऊन दिसला.
5/6
Neha Kakkar spotted
नेहा सध्या सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत आहे, ज्यात तिचं पोट कशानं तरी झाकलेले दिसत असतं. ती मुख्यतः सिटिंग पोझेसमध्ये फोटो शेअर करते.
6/6
Neha Kakkar spotted
नुकताच नेहाच्या इन्स्टाग्रामवर 60 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. तिनं आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला होता.