
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना सध्या तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. यापूर्वी तिनं बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले होते आणि आता पुन्हा एकदा 'नागिन' फेम अभिनेत्री सुरभीनं बिकिनी परिधान करुन फोटो शेअर केले आहेत.

सुरभीनं तिच्या मालदीव ट्रीपचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात ती अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

डिझायनर रंगीबेरंगी बिकिनीमध्ये स्वतःचे हे फोटो शेअर करत सुरभीनं लिहिलं, 'आज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी, मी समुद्रात डुबकी मारण्याचा निर्णय घेतला.'

या फोटोंमध्ये सुरभी चंदना खुल्या केसांमध्ये बोल्ड लूक देताना दिसत आहे. तिच्या मागे समुद्र दिसतोय.
