

विवेक अग्निहोत्री हे दिग्दर्शक आहेत. त्यांनी द ताश्कंद फाईल्स, जुनुनियत, जिद, बुद्धा इन ट्रॅफिक जॅम, हेट स्टोरी या सारखे सिनमे केले आहेत.

पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची पहिली भेट एका रॉक कॉन्सर्टमध्ये झाली. तिथे ते एकमेकांशी फार बोलले नाहीत. तेव्हा पल्लवीला विवेक फार उद्धट वाटले होते.

पण हळूहळू दोघांची मैत्री वाढत गेली. बघता-बघता दोघे प्रेमात पडले. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

28 जून 1997 या दिवशी दोघे लग्नबंधनात अडकले. त्यांचा लग्नाला आता 25 वर्ष पूर्ण झाली आहे.