
सध्या सोशल मीडियावर कियारा अडवाणीच्या फोटोंचा बोलबाला आहे. एकापाठोपाठ एक, कियारा आपल्या लूकनं सर्वांना वेड लावत आहे. आतापर्यंत कियारा पाश्चिमात्य लूकमध्ये ग्लॅमरस फोटो शेअर करत होती, मात्र आता तिनं पारंपरिक लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत.

कानात झुमके आणि कपाळावर बिंदी, तुम्हीही कियाराच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल. कियारानं सिद्धार्थ सोबत देखील फोटोशूट केलं आहे आणि दोघंही एकत्र परफेक्ट दिसत आहेत. निळ्या रंगाच्या सूटमध्ये सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहे.

कियारा आणि सिद्धार्थ शेरशाह चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

कियारा अडवाणी सध्या तिच्या आगामी शेरशाह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दररोज ती कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जात आहे.

या फोटोशूटमध्ये कियारा एक मोहक पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यात ती ब्रलेट आणि स्कर्टच्या सेटमध्ये दिसत आहे.