
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’चं (Bigg Boss Marathi 3) तिसरं पर्व सुरू झालं आहे. अशात प्रेक्षकांचे लाडके कलाकार अतिशय उत्तम प्रकारे खेळ खेळत आहेत. अभिनेत्री गायत्री दातारही या पर्वात भाव खाऊन जात आहे.

आता नवरात्री निमित्त गायत्रीनं सुंदर फोटोशूट केलं आहे. करड्या रंगाचा कुर्ता परिधान करत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

नुकतंच गायत्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. आता गायत्रीचा नवा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार रसिकांच्या मनावर राज्य करतेय. 'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिला खास ओळख मिळाली. आता सध्या गायत्री बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.