
बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्री या बॉडी शेमिंगच्या शिकार झाल्या आहेत. ऐश्वर्या राय ही देखील बऱ्याच वेळा बॉडी शेमिंगची शिकार झालीये. वजन वाढल्यानंतर तिच्या बाॅडीवर अनेकदा कमेंट या केल्या गेल्या.

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही देखील यापूर्वी बऱ्याच वेळा बॉडी शेमिंगची शिकार झालीये. तिच्या वाढलेल्या वजनामुळे नेहमीच सोनाक्षी सिन्हा हिला टार्गेट केले जाते.

नेहा धूपिया हिचे वजन प्रेग्नसीनंतर वाढले होते. यानंतर अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट केल्या. नेहा धूपिया ही देखील अनेकदा बॉडी शेमिंगची शिकार झालीये.

राधिका आपटे ही देखील बऱ्याच वेळा बॉडी शेमिंगची शिकार झालीये. लोकांनी तिच्या ब्रेस्ट साईजवर कमेंट केल्या. बॉडी शेमिंगच्या विषयावर अनेकदा राधिका बोलली आहे.

टीव्ही अभिनेत्री रूबिना दिलैक ही पण बऱ्याच वेळा बॉडी शेमिंगची शिकार झाली असून काही लोकांनी तर तिच्या कमी हाईटवर देखील कमेंट केल्या. रूबिना दिलैक ही नेहमीच चर्चेत असते.