
सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अवनीत कौर आहे.

अवनीत कौर फक्त अभिनेत्री नाहीतर, सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडिया, जाहिराती इत्यादी मार्गांनी अवनीत वयाच्या 22 व्या वर्षी गडगंज पैसा कमावते.

अवनीत सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अवनीत हिच्या नव्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अवनीत हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘टीकू वेड्स शेरु’ सिनेमात अभिनेत्रीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. अवनीत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.