
अभिनेता चंकी पांडेचा उद्या 60 वा वाढदिवस आहे. त्यापूर्वीच चंकी पांडेने प्री बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक बाॅलिवूड स्टार्सने हजेरी लावलीये.

अनन्या पांडेला अनेक चित्रपट मिळत असल्याने अगोदरच चांगल्या मूडमध्ये असलेल्या चंकी पांडेने खास प्री बर्थडे पार्टीचे आयोजन केले.

चंकी पांडेच्या या बर्थडे पार्टीमध्ये सलमान खानने देखील हजेरी लावली होती. यावेळी सलमानची स्टाईल एकदम हटके बघायला मिळाली.

चंकी पांडेच्या बर्थडे पार्टीमध्ये आर्यन खान देखील पोहचला होता. आर्यन खान आणि चंकी पांडेची लेक अनन्या पांडे खूप चांगले मित्र आहेत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रेही पतीसोबत या पार्टीमध्ये पोहचली होती. सोनाली आणि चंकी पांडे चांगले मित्र आहेत. यावेळी सोनालीचा लूक बघण्यासारखा होता.