

बिग बॉसचे 16 मधून बाहेर आल्यावर टीना दत्ता हिने सुंबुल ताैकीर हिच्यावर टिका केली होती. त्यानंतर सुंबुल ताैकीर हिने देखील टीना दत्ता हिचा चांगलाच समाचार घेतला.

बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर सुंबुल ताैकीर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. नुकताच सुंबुल ताैकीर हिने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुंबुल ताैकीर हिचे हे फोटो पाहून टीना दत्ता हिच्या चाहत्यांचा चांगलाच पारा चढला आहे. सुंबुल ताैकीर हिच्यावर कॉपी करण्याचा आरोप टीना दत्ता हिच्या चाहत्यांनी केला आहे.

सुंबुल ताैकीर हिला टीना दत्ता हिचे चाहते टार्गेट करत असताना सुंबुल ताैकीर हिच्या चाहत्यांनी टीना दत्ता हिच्या चाहत्यांना निशाणा बनवले. आता चाहत्यांमध्ये वाद बघायला मिळत आहे.