
‘ॲनिमल’ फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र तृप्तीच्या फोटोशूटची चर्चा रंगली आहे.

अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमात अभिनेत्री तृप्ती डिमरी (Triptii Dimri) हिची फार लहान भूमिका होती. पण त्याच भूमिकेमुळे तृप्ती हिला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली...

आता देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री नवे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

तृप्ती हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

तृप्ती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री सध्या बॉयफ्रेंड सॅम मर्चंट याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.