
उर्फी जावेद कायमच तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत राहते. उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याची थेट धमकी देखील मिळाली आहे. मात्र, कोणत्याही धमक्यांना उर्फी जावेद घाबरत नाही.

सोशल मीडियावरही उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर कायमच उर्फी चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते. नुकताच उर्फी जावेद हिने तिचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत.


या फोटोमध्ये उर्फी जावेद हिने ब्राउन रंगाचा लेदरचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये उर्फीचा लूक काहीतरी वेगळा दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्फी जावेद हिच्या या फोटोशूटवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एका युजर्सने थेट उर्फी जावेद हिला या ड्रेसचे नावच विचारून टाकले आहे.