
'नवरी मिळे हिटलरला' मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. एजे- लीलाचं लग्न झाल्यानंतर आता त्यांचं नातं नव्या वळणावर आलं आहे. या दोघांचं नातं आता फुलू लागलं आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडत आहे.

लीला ही भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराज हिने सोशल मीडियावर अभिराम अर्थात अभिनेता राकेश बापट याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेचे 100 पूर्ण झाले. त्यानिमित्त वल्लरी विराजने खास फोटो शेअर केलेत. पहिल्या दिवसाचा फोटो ते मालिकेने 100 भाग पूर्ण केल्यानंतरचा फोटो..., असं म्हणत वल्लरीने हे फोटो शेअर केलेत.

परफेक्ट हिटलरच्या इम्परफेक्ट संसाराची सुरुवात झाली आहे. एजे- लीलाच्या रिसेप्शन पार पडलं आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला 1001 प्रदक्षिणा घातल्या.

हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघे ही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार झालेत. त्यामुळे लिला आणि एजेचं नातं या पुढे कसं बहरतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.