
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने त्याच्या खास अंदाजाने आणि अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिद्धार्थ याच्या मृत्यूला दोन वर्ष झाली आहे. तरी देखील चाहते अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत. अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सिद्धार्थ शुक्ला याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची प्रकृती खालावली आणि सिद्धार्थ याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी अभिनेत्याला मृत घोषित केलं.

मृत्यूच्या 40 दिवस आधी अभिनेत्याने एक ट्विट केलं होतं. अभिनेत्याचं ट्विट तुफान व्हायरल झालं. सिद्धार्थ ट्विट करत म्हणाला होता, 'स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर अशी ओळख निर्माण करा, लोकांनी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न नाही तर, कट रचला पाहिजे...' आजही सिद्धार्थ वक्तव्य चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.

अभिनेत्याचं आणखी ट्विट तुफान व्हायरल झालं होतं. 'मृत्यू... आयुष्यातील मोठं नुकसान नाही.... आपण जिवंत असताना आपल्यामध्ये जे मरत आहे... ते सर्वात मोठं नुकसान आहे...' असं वक्तव्य अभिनेत्याने मृत्यूबद्दल केलं होतं.

सिद्धार्थ शुक्ला याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी होती. सोशल मीडियावर आजही सिद्धार्थ याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.