
ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यामुळे लक्षात राहतेच. पण ती एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. तिचे लाखो चाहते आहेत. करियरमध्ये तिने अनेक चांगल्या चित्रपटात काम केलं आहे.

ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला. 1994 साली दक्षिण आफ्रिकेच्या सन सिटीमध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकला.

बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने चित्रपटांच्या सेटवर तिला म्हटलेलं की, त्यांना तिची मिस वर्ल्डची इमेज संपवायची आहे.

'ताल' हा ऐश्वर्या रायच्या करियरमधील एक हिट चित्रपट आहे. सुभाष घई यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. तिच्यासोबत अनिल कपूर आणि अक्षय खन्ना या दोघांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली.

'ताल' सिनेमासाठी ऐश्वर्याला रायला कास्ट केलं. त्यावेळी सुभाष घई तिची मिस वर्ल्डची इमेज संपवण्याबद्दल बोलले होते. स्वत: सुभाष घई एका शो मध्ये या बद्दल बोललेले.