
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janvhi Kapoor) हिने आपल्या करिअरची सुरूवात ‘धडक’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर अभिनेत्रीसोबत दिसला होता. ‘धड़क’ हा ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. चाहत्यांना देखील हा चित्रपट खूप आवडला आणि जान्हवीचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर जान्हवीच्या वाट्याला बरेच चित्रपट आले. दरम्यान, चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीने एका मिस्ट्री बॉयसह एक फोटो शेअर केला आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह दिसत आहे. ही अभिनेत्री दररोज आपल्या फोटोंद्वारे आणि व्हिडीओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. नुकतेच अभिनेत्रीने आपले बिकीनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, हे पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.

अलीकडेच अभिनेत्रीने आपले बिकिनी फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती ओले केसांना सावरताना दिसत आहे. तर, दुसरा फोटो ज्यावर प्रत्येकाचे डोळे स्थिरावले आहेत. या फोटोमध्ये ती एका मिस्ट्री बॉयसह दिसली आहे.

प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, अभिनेत्रीसोबत तो मुलगा नक्की कोण आहे? या फोटोत जान्हवीसोबत दिसणाऱ्या मुलाचे नाव ओरहान अवात्रामणि (Orhan Awatramani ) असे आहे. या आधीही जान्हवीचे आणि ओरहान अवात्रामणि एकत्र फोटो व्हायरल झाले आहेत. दोघेही बेस्ट फ्रेंड असल्याचे सांगितले जाते.

या फोटोमध्ये जान्हवी प्रचंड हॉट दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.