
प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने अनेक वर्षांनंतर घटस्फोटावर वक्तव्य केलं. दरम्यान त्याने पहिल्या पत्नी घटस्फोटाच्या वेळी मोठी रक्कम देखील दिली.

प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग याने पत्नी शालिनी तलवारला घटस्फोट दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हनी सिंगने घटस्फोटानंतर शालिनीला पोटगी म्हणून एक कोटी रुपये दिल्याचं कळतंय.

घटस्फोटावर हनी सिंगने मोठं वक्तव्य देखील केलं. '9 - 10 महिने आमच्या आयुष्यात सर्वकाही ठिक होतं. पण करियरमध्ये प्रगती होत गेली, तेव्हा मी प्रसिद्धी, पैसा आणि नशेच्या आहारी गेलो....

हनी सिंग आणि शालिनी यांच्यामध्ये वाद देखील होऊ लागले होते. अशात 2022 - 23 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. असं देखील हनी सिंग म्हणाला होता.

हनी सिंग याच्या आगामी अल्बमबद्दल सांगायचं झालं तर, हनी सिंग सध्या 'ग्लोरी' अल्बममुळे चर्चेत आहे. चाहते हनी सिंगच्या आगामी गाण्याच्या प्रतीक्षेत आहे.