
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान याच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. यामुळे सलमान खान याचे चाहते टेन्शनमध्ये आहेत.

सलमान खान हा त्याच्या कपड्यांमुळे आणि गाड्यामुळे कायमच चर्चेत असतो. अत्यंत महागड्या गाड्या या सलमान खान याच्याकडे आहेत. आता सलमान खान हा त्याच्या महागड्या घड्याळीमुळे चर्चेत आलाय.

सलमान खान याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये रोलेक्सची घडी दिसत आहे. या घडीची किंमत ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलाय.
