
स्टेजवर उभं राहून उपस्थितांना खळखळून हसवणं ही काही सोपी गोष्ट नव्हे... प्रेक्षकांना आपल्या संवादात गुंतवून ठेवणं अन् त्यांचं मनोरंजन करणं हे एका कॉमेडियनचं काम... भारतातील एका कॉमेडियनला नेमकं जमलंय...

हा कॉमेडियन दुसरा तिसरा कुणी नसून हा आहे जाकीर खान... जाकीर खानची कॉमेडी ऐकली नाही, असं क्वचितच कुणी असेल. जाकीर खानच्या कॉमेडीने अनेकजण चाहते आहेत.

सामान्य घरातील मुलगा ते भारताचा प्रसिद्ध कॉमेडियन... असा जाकीर खानचा प्रवास राहिलेला आहे. इन्स्टाग्रामवर जाकीरचे 6 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

जाकीर खान लाईव्ह शो देखील करतो. त्याचे हे शो हाऊस फुल होतात. भारतासह परदेशातही जाकीर लाईव्ह शो करत असतो.

'वैसे मै सख्त लोंडा हूँ... लेकीम यहाँ मै पिघल गया...' हा त्याचा डायलॉग प्रसिद्ध आहे. त्याच्या आयुष्यातील काही किस्से सांगत तो लोकांचं मनोरंजन करतो.