CJP Abhijeet Dipke : ‘चला या मी इथे..’ अभिजीत दीपके असलेल्या विमानात फुल राडा, तिथे जे घडलं त्याचे PHOTOS
CJP Abhijeet Dipke : अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आज दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. पण त्याआधीच विमानात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना विमानातच अटक करण्यात आली आहे. यावेळी विमानात एकच गोंधळाची स्थिती होती. इंदिरा गांधी यांनी सुद्धा असं केलं नव्हतं. ही हुकूमशाही आहे असं अभिजीत दीपके म्हणाले.
अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास या तिघांना ताब्यात घेतलं आहे. हे तिघेही सीजेपीचा चेहरा आहेत. आज सकाळी ते मुंबईहून विमानाने दिल्लीला निघाले होते.
या करा मला अटक करा, मी अटक करुन घेण्यासाठीच आलो आहे असं अभिजीत दीपके अटक करताना बोलत होते. दिल्ली विमानतळावर उतरुही दिलं नाही. त्याआधीच त्यांना ताब्यात घेतलं.
अभिजीत दीपकेच्या सीजेपीने आज जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. तिथे कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे.
"मी तर जंतर-मंतरवर जाणार आहे. तुम्हाला मला रोखायचं असेल तर अडवा. UAPA जी कुठली कलमं लावायची आहेत ती लावा. आर्टिकल 19 ने मला आंदोलनाचा अधिकार दिला आहे" असं अभिजीत दीपके विमानात टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना म्हणाले होते.