Abhijeet Dipke : जंतरमंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दीपकेंचे इन्स्टावरील फॉलोअर्स किती? दीपके किती जणांना करतात फॉलो?
पेपरफुटी आंदोलनामुळे चर्चेत आलेले अभिजीत दिपके आता सोशल मीडियावर पुन्हा हिट झाले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो केल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. पण दिपके यांचे एकूण फॉलोअर्स किती, ते कोणाकोणाला फॉलो करतात ? हे जाणून घेण्याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

पेपरफुटी आंदोलनामुळे चर्चेत आलेले कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. यावेळी कारण आहे बॉलिवूड आणि त्यांच्या वाढत्या डिजिटल लोकप्रियतेचे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने इंस्टाग्रामवर अभिजीत दिपके यांना फॉलो केल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, प्रियंका चोप्रासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्रीच्या मर्यादित Following यादीत अभिजीत दिपके यांचे नाव दिसल्याने नेटकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे. ( All Photos - SocialMedia/ Instagram)

अभिजीत दिपके यांची सोशल मीडिया लोकप्रियता गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. इंस्टाग्रामवर त्यांचे तब्बल 4.9 मिलियन (49 लाख) फॉलोअर्स आहेत. ते स्वतः केवळ 557 जणांना फॉलो करतात. त्यांच्या अकाऊंटवर सुमारे 349 पोस्ट्स आहेत. त्यांनी केलेल्या पोस्ट, व्हिडिओ आणि सामाजिक मुद्द्यांवरील भूमिकांना लाखो लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसलं.

पेपरफुटी प्रकरणाविरोधात उभारलेल्या आंदोलनामुळे अभिजीत दिपके यांची ओळख देशभरात पोहोचली होती. त्यांच्या आंदोलनाची चर्चा सोशल मीडियापासून ते राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वर्तुळापर्यंत झाली. त्यानंतर त्यांचा ऑनलाइन प्रभाव आणि फॉलोअर्सची संख्या सातत्याने वाढत गेली. अभिजीत दिपके यांच्या वाढत्या फॉलोअर्स, डिजिटल प्रभाव आणि सोशल मीडिया उपस्थितीमुळे त्यांची चर्चा सातत्याने वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे, प्रियंका चोप्रा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 92.8 मिलियन फॉलोअर्स असून, ती केवळ सुमारे 650 अकाउंट्स फॉलो करतात. तिच्या या निवडक Following यादीत अभिजीत दिपके यांचे नाव दिसल्याने त्यांच्या लोकप्रियतेची चर्चा आता बॉलिवूडपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे.

आता सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे — प्रियंका चोप्रांनी अभिजीत दिपके यांना फॉलो केल्यानंतर अभिजीत दिपके त्यांना फॉलो बॅक करतात का? सोशल मीडियावर फॉलो बॅकची चर्चा सुरू असून, अनेक नेटकरी हे अभिजीत दिपके यांची Following यादीही तपासत आहेत.

अवघ्या 30 वर्षांचा असलेला अभिजीत दीपके मूळचे हिंगोलीचा आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील अभिजीतने पुण्यातून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केलं. नंतर ते पुढल्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठातून पब्लिक रिलेशन्स या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली. 2020 ते 2022 दरम्यान त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये व्हॉलिएंटर म्हणून काम केलं आहे.